shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे अहमदनगर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाघोली ते शिरूर ५६ किलोमीटरचा महामार्ग लवकरच...!


पुणे । प्रतिनिधी:-
सध्या महाराष्ट्रात रस्त्याच्या निर्मितीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फारच मनावर घेतल्याचे दिसून येते.. 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) बांधलेल्या अहमदनगरमधील तीन किमी लांबीच्या चार डेक उड्डाणपुलाचे 19 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. मुंबई ते दिल्ली या ‘ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे’ मुळे अहमदनगर भविष्यात देशाच्या नकाशावर येईल, असे गडकरी उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.


सुरत-नाशिक-नगर-सोलापूर येथून चेन्नईला जाणाऱ्या नवीन ‘ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे’ची लांबी अहमदनगर जिल्ह्यात १४१ किमी आहे. हा प्रकल्प 80,000 कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात शक्य तेथे लॉजिस्टिक पार्क उभारणे शक्य आहे.

त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. आम्ही हा महामार्ग अ‍ॅक्सिस कंट्रोलने बनवत आहोत. सध्या त्याची लांबी 1600 किमी आहे. मुंबई-पुणे, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर या मार्गांवरही वाहतूक, अंतर आणि प्रदूषण कमी होईल,’ असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. नवीन पुणे-औरंगाबाद महामार्गाचे काम येत्या काळात लवकरच करण्यात येणार आहे.
close