shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आ. दत्तात्रय भरणे यांनी डिकसळ गावच्या उपसरपंच पदी सौ ललिता अनिल पोंदकुले यांची बिनविरोध निवडीबद्दल सत्कार करून केले अभिनंदन.

आ. दत्तात्रय भरणे यांनी डिकसळ गावच्या उपसरपंच पदी सौ ललिता अनिल पोंदकुले यांची बिनविरोध निवडीबद्दल  सत्कार करून केले अभिनंदन.
  इंदापूर प्रतिनिधी :इंदापूर तालुक्यातील डिकसळ ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ ललिता अनिल पोंदकुले यांची दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी उपसरपंच मारुती रामा शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंच सूर्यकांत सवाने यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल राज्याचे माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे व सारिकाताई भरणे यांनी सौ ललिता अनिल पोंदकुले यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 यावेळी माजी सरपंच रावसाहेब गवळी मारुती शिंदे लक्ष्मण शिंदे धनंजय पवार आजिनाथ गायकवाड सौ सुनीता गवळी सौ माधुरी भोसले यांच्यासह डिकसळ ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
close