लहान मुलांमध्ये टोमॅटो सदृश्य व्हायरस या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पालकांनी तात्काळ वैद्यकीय उपचार करावे - बालरोग तज्ञ डॉ. सत्यम कदम
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यात गेल्या दीड ते दोन महिन्यापासून लहान मुलांमध्ये प्रथमच टोमॅटो सदृश्य व्हायरस या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा रोग घातक नसला तरी पालकांनी रोगाची लागण होताच लहान मुलांवर तात्काळ वैद्यकीय उपचार करावे असे आव्हान बावडा येथील बालरोग तज्ञ डॉक्टर सत्यम कदम यांनी केले आहे. या रोगामध्ये लहान बालकांचे तळहात व तळपाय यावर येणारे पुटकूळया टोमॅटो सदृश दिसत असल्यास त्याला टोमॅटो व्हायरस म्हणतात. या रोगांमध्ये लहान मुलांच्या तोंडामध्ये पुटकुळ्या येणे. ताप येणे. मुलाने किरकिर करणे. तळपाय आणि तळहातावर पुटकुळ्या येणे आदी लक्षणे दिसून येतात. त्वरित वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आव्हान डॉक्टर सत्यम कदम यांनी केले. पालकांनी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लहान मुलांना कुत्री, मांजर व जनावरापासून दूर ठेवावे. कारण प्राण्यांच्या अंगावरील पिसा मार्फत या रोगांचा फैलाव होतो असे त्यांनी सांगितले .दरम्यान सध्या डेंगू चा प्रादुर्भाव लहान मुलांवर व नागरिकांवर मोठ्या संख्येने वाढल्याने नागरिकांनी घर परिसर स्वच्छ ठेवावा. जेणेकरून डासांचा प्रादुर्भाव होणार नाही असे आव्हान बावडा येथील डॉक्टर सत्यम कदम यांनी केले आहे.