shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आप्पासाहेब ढूस ॲट्रॉसिटी प्रकरणातील....दत्ता सोपान पटेकर याचा जामीन अर्ज नामंजूर.


भगवान के घर देर है.., अंधेर नहीं..! - आप्पासाहेब ढूस 

अहमदनगर - दि. २४/११/२२ 
प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांचेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणाऱ्या डिग्रस येथील बांधकाम ठेकेदार दत्ता सोपान पटेकर याचा जामिन अर्ज अहमदनगर येथील मे. शेषन कोर्टाने काल दि.२२ रोजी नामंजूर केला आहे. 

       अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा येथील रहिवासी असलेल्या आंतराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी त्यांच्या  घराचे बांधकाम राहुरी येथील इंजिनिअर विश्वास धोंडे यांचे सूचनेवरून राहुरी तालूक्यातीलच डिग्रस येथील बांधकाम ठेकेदार दत्ता सोपान पटेकर याला १०० रुपयांचे स्टॅम्प पेपर वर रितसर करारनामा करून काम दिले होते.  त्या करारनाम्यात बांधकामाचे सर्व दर ठरविण्यात आले आहेत. तसेच करारनाम्यानुसार बांधकामाचे मोजमाप करण्याची व अंतिम बिल बनविण्याची सर्वस्वी जबाबदारी ही इंजिनियर धोंडे यांची असल्याने धोंडे यांनी दिलेल्या अंतिम बिलाची सर्व रक्कम आप्पासाहेब ढूस यांनी वेळोवेळी ठेकेदार पटेकर याला रक्कम अदा केल्याची लेखी पोहोच घेऊन चुकती केली होती. तरीही ठेकेदार पटेकर हा आप्पासाहेब ढूस यांना खोट्या तक्रारीत अडकविण्याची धमकी देऊन करारनाम्यातील तरतुदीपेक्षा जास्त पैशांची वारंवार मागणी करत होता. ठेकेदार पटेकर याने इंजिनियर मार्फत रक्कम मागणे अपेक्षित असताना हा ठेकेदार ढूस यांना खोट्या तक्रारीची भिती दाखवत वारंवार परस्पर रक्कम मागत असल्यानं ढूस यांना त्याची मागणी मान्य नव्हती.  

     दि.११/१०/२०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास ठेकेदार दत्ता सोपान पटेकर याने देवळाली प्रवरा येथील आप्पासाहेब ढूस यांच्या घरात जबरदस्तीने घुसून मला दिड लाख रुपये दे नाहीतर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची व जिवे मारण्याची धमकी देऊन आप्पासाहेब ढूस यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याची साखळी हिसकावून नेली. त्याबाबत आप्पासाहेब ढूस यांनी देवळाली प्रवरा पोलीस ठाण्यात त्याच दिवशी पटेकर याच्या विरोधात रितसर तक्रार दाखल केली होती. 

     त्यास दत्ता पटेकर याने अहमदनगर येथील मे शेषन कोर्टात आव्हान दिले होते. तथापी अहमदनगर येथील मे. शेषन कोर्टाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कागदपत्रांची सत्यता तपासून पटेकर याचा जामीन अर्ज नामंजूर केला.

      प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढूस यांनी सांगितले की, भगवान के घर देर है, अंधेर नही. पोलीस प्रशासन आणि न्यायदेवता यांच्यावर विश्वास असल्याचे आम्ही यापूर्वीच बोलून दाखविले होते. भारतीय नागरिकाला सत्याच्या बाजूने न्यायालयात न्याय मिळतोच.   न्यायदेवता योग्य न्याय देईल याचा आम्हाला विश्वास होता. आणि तो खरा ठरला.  

     तसेच अहमदनगर येथील मे. शेषन कोर्टात आप्पासाहेब ढूस यांची प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा  कायदे विषयक सल्लागार विधी तज्ञ ॲड. पांडुरंग औताडे यांनी सक्षमपणे बाजू मांडली व त्यांना ॲड. अक्षय खाडे व ॲड. गणेश खपके यांनी सहाय्य केले. त्याबद्दल त्यांचे ढूस यांनी आभार व्यक्त केले.
close