श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दशरथ घोगरे यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार.
इंदापूर प्रतिनिधी: शिव पूजा प्रतिष्ठान इंदापूर आयोजित कार्यक्रमांमध्ये इंदापूर या ठिकाणी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य घोगरे डी आर सर यांना त्यांनी केलेल्या सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याबद्दल सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
इंदापूर गौरव पुरस्कार २०२२ साठी आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यालयासाठी निश्चितच ही अभिमानाची गोष्ट आहे. कोणत्याही कार्यामध्ये हिरीरीने भाग घेणारे, कामामध्ये तत्पर असणारे सर्वांना सामावून घेऊन पुढे जाणारे श्री घोगरे डी आर सर यांना हा पुरस्कार मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे.
शिव पूजा प्रतिष्ठान इंदापूर तर्फे दशरथ रामचंद्र घोगरे यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील मा सहकार व संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अभिनंदन केले. तसेच निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील , श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मनोजराव पाटील , श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे सचिव व सरपंच .किरण पाटील व संचालक मंडळ सर्व अध्यापक अध्यापिका इतर सर्व कर्मचारी विद्यार्थी मित्र सर्वांनी अभिनंदन केले.
आज विद्यालयामध्ये श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक हासे सर बनकर सर पाटील सर व सर्व अध्यापक अध्यापिका यांच्यावतीने घोगरे डी आर सर यांचा सन्मान करण्यात आला.

