shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी रतिलाल कुचेकर आणि सतीश भोंग यांची नियुक्ती .

प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी रतिलाल कुचेकर आणि सतीश भोंग यांची नियुक्ती .
इंदापूर प्रतिनिधी:दि.१७. आज इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेच्या माननिय सभापती दत्ताञय ठोंबरे यांच्या  अध्यक्षतेखाली झालेल्या  संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये तज्ञ संचालकाची नियुक्ती करण्यात आली.
    नवनियुक्त संचालकांना शुभेच्छा देताना  स्वाभिमान परिवारातील शिक्षक सोसायटीचे सभापती दत्ताञय ठोंबरे, उपसभापती सतीश गावडे,सचिव प्रशांत भिसे, शिक्षक संघाचे अध्यक्ष नानासाहेब नरूटे ,इब्टा  संघटनेचे अध्यक्ष सहदेव शिंदे ,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तथा संचालक सुहास मोरे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष सतीश शिंदे यांची  प्रमुख उपस्थिती होती.
     तसेच  मा.चेअरमन अदिनाथ धायगुडे, मा.व्हा.चेअरमन रामचंद्र शिंदे,जेष्ठ संचालक  बालाजी कलवले, दत्ताञय  चव्हाण ,अनिल शिंदे ,भारत बांडे,किशोर वाघ ,संजय म्हस्के,  भाऊसाहेब वनवे,शशिकांत शेंडे ,प्रशांत घुले,सचिन देवडे, संतोषकुमार तरंगे, सदाशिव रणदिवे ,मा.तज्ञ संचालक मधुकर भोंग व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते . 
    सदर नियुक्ती दरम्यान अनेक शिक्षक बांधवांनी नवनियुक्त तज्ञ संचालकांना शुभेच्छा दिल्या.
    *संस्थेच्या सभासदांना अग्रभागी समजून चांगले व हितावह निर्णय घेतले जातील .सभासदांच्या अडचणी कशा दूर होतील या बाबतीतही  हा स्वाभिमान परिवार  सभासदांचाच निश्चितच ठामपणे विचार करेल यात शंका नाही. असे मत सभापती दत्ताञय ठोंबरे यांनी व्यक्त केले.
   सदर नियुक्ती करताना सर्व समावेशक व चांगले आदर्श कामकाज करणाऱ्या संचालकांची संस्थेला आवश्यकता असते म्हणूनच अशा शिक्षक बांधवांची निवड करण्यात आली.
     तसेच या पुर्वी ही असणारे तज्ञ संचालक मधूकर भोंग व सुप्रिया आगवणे मॕडम यांनी ही अतिशय योग्य भुमिका घेऊन संस्थेच्या हिताचेच काम केले. त्यांचे ही कौतुक संघाचे अध्यक्ष नानासाहेब नरूटे यांनी व्यक्त केले.
     सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातून अनेक  बांधव बहूसंख्येने उपस्थित होते .शेवटी संस्थेचे संचालक प्रशांत घुले यांनी नवनियुक्त संचालकांना शुभेच्छा दिल्या व सर्व उपस्थितांचे आभार मानले.
close