विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे व आरोग्याकडे लक्ष द्यावे - रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेंद्र गांधी. इंदापूर प्रतिनिधी:दि.२१ नोव्हेंबर २०२२ रोजी इंदापूर येथे बीटस्तरीय यशवंतराव चव्हाण कला-क्रीडा स्पर्धा पार पडल्या.या स्पर्धेचा उदघाटन समारंभ प्रा.विलास जाधव सर यांच्या हस्ते पार पडला.यावेळी बोलताना रोटरी क्लब चे अध्यक्ष नरेंद्र गांधी यांनी विद्यार्थाना अभ्यासाबरोबरच खेळाकडे व आरोग्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.स्पर्धेचे यशस्वी आयोजन इंदापूर बीटचे विस्तार अधिकारी हनुमंत शिंदे यांनी केले.
यावेळी रोटरीचे सचिव सुनिल मोहिते,सदस्य भीमाशंकर जाधव,प्रशांत घुले,मोकळे सर तसेच शिक्षक उपस्थित होते.
या अंतर्गत लोकनृत्य स्पर्धा,लेझीम स्पर्धा,अभंग स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,५० मी.धावणे,१०० मी धावणे,लांबउडी,उंचउडी,गोळाफेक,थाळीफेक तसेच कबड्डी,खो-खो या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ इंदापूर च्या वतीने ट्रॉफी,प्रमाणपत्र व मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन देवडे यांनी केले.आभार सुहास मोरे यांनी मांडले.