प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीत पदवीधर, संशोधक, विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन भाजपचे नेते रमेशराव आडसकर यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंगळवारी ( दि.२२) केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाशराव आनंदगावकर होते.
यावेळी पुढे बोलताना रमेशराव आडसकर म्हणाले की, विद्यापीठ विकास मंचच्या वतीने बीड जिल्ह्यातून खुल्या प्रवर्गातून योगिता होके पाटील निवडणूक लढवत आहेत. एस सी प्रवर्गातून छाया खाजेकर, एस टी प्रवर्गातून मोहम्मद अझहरुद्दीन, व्हिजेएनटी प्रवर्गातून चंद्रकांत फड, ओबीसी प्रवर्गातून संतोष थोरात आणि महिला प्रवर्गातून ज्योती तुपे या निवडणुक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. प्रकाशराव आनंदगावकर म्हणाले की, विद्यापीठात सिनेटला खूप महत्त्व आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. यामुळे विद्यापीठ विकास मंचच्या सर्व उमेदवारांना विजयी करा,असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. कमलकिशोर लड्डा यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता महाजन यांनी केले तर आभार सरपंच रुपाली कचरे यांनी मानले. यावेळी बबनराव सोळंके, अरुण राऊत, डॉ . भगवान सरवदे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अशोक तिडके, बबनराव सिरसट, छायाताई कुलकर्णी, विनायक रत्नपारखी, मनोज फरके, बाळासाहेब क्षीरसागर, ईश्वर खुर्पे, भारत होके, बालासाहेब तेलगड, अनंत जगताप, अर्जुन पायघन, नामदेव मुळे, सुभाष कांबळे, दिलीप सोळंके, जयपाल भिसे, मंचक गायकवाड, राम शिंदे, उमेश जाधव, संतोष जाधव, अयुबभाई पठाण, प्रल्हाद दळवी, महादेव कुंडकर, हनुमान बडे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

