shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वीट होम ट्रस्ट नवी मुंबईच्या वतीने निमसाखरचे सुपुत्र आबा विठ्ठल रणवरे यांना सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे पुरस्काराने सन्मानित

स्वीट होम ट्रस्ट  नवी मुंबईच्या वतीने  निमसाखरचे सुपुत्र आबा विठ्ठल रणवरे यांना  सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे पुरस्काराने सन्मानित.                              इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील निमसाखर गावचे सुपुत्र व जुईनगर मुंबई येथील रहिवासी आबा विठ्ठल रणवरे यांना आयुर्वेदाचार्य व पर्यावरण मित्र म्हणून सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार २०२२ ने वाशी येथील प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय सभागृहात स्वीट होम ट्रस्ट प्रस्तुत नवी मुंबई यांच्या वतीने पुरस्कार व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.                पुरस्कार स्वीकारते वेळी                                   स्वीट होम ट्रस्ट कोपरखैरणे नवी मुंबई आयोजित सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज डॉ. शितलताई मालुसरे, आर्मी फौजी श्री सुरेश कौठाळे, पद्मश्री सौ राहीबाई पोपेरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होते.     ऐतिहासिक सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार आणि झाशीची राणी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दिनांक ,६ नोव्हेंबर २०२२ रोजी रोजी मराठी साहित्य  सांस्कृतिक कला मंडळ व प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय सभागृह हॉल वाशी सेक्टर ६ येथे संपन्न झाला.
close