सांगली : प्रतिनिधी
दि. 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी सांगली दक्षिण यांच्या वतीने विश्वशांती बुद्ध विहार सांगली या ठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडी सांगली दक्षिण चे जिल्हाध्यक्ष मा. महावीर (तात्या)कांबळे, जिल्हा महासचिव राजू मुल्ला,जिल्हा उपाध्यक्ष केतन माने, त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा खरात जिल्हा जिल्हा प्रवक्ते मनोहर कांबळे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत सर्वदे जिल्हा महासचिव युवा संदीप कांबळे, कवठेमंकाळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय आठवले कवठेमंकाळ उपाध्यक्ष किरण बनसोडे जिल्हा सदस्य अशोक लोंढे किशोर आढाव परसराम कुदळे श्रीकांत ढाले अनिल कांबळेमिरज शहराध्यक्ष सतीश शिकलगार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून संविधानाची प्रास्ताविका वाचण्यात आली.
त्यानंतर उपस्थित मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यासोबतच 26/11 या दिवशी देशावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आभार किशोर आढाव यांनी मांडले

