शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन):
महाराष्ट्र एनजीओ फेडरेशनचे नगर शहराध्यक्ष तथा आदर्श समाजसेवक आण्णासाहेब बनसोडे यांना बीड येथे नुकताच रयत सामाजिक प्रतिष्ठानचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखणिय काम केल्याबद्दल पुरस्कार मिळाला.तसेच मावळ येथे आदर्श समाजसेवक पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल श्री संत सावता माळी युवक संघाच्या वतीने त्यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
नगर महापालिकेचे नगरसेवक धनंजय भैय्या जाधव यांच्या हस्ते आण्णासाहेब बनसोडे यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषन लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड, गवर्मेंट कॅांन्ट्रक्टर आनंदभाऊ पुंड, नगर तालुका सल्लागार लवेश गोंधळे,जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जाधव, डॅा भगवान चौरे, ब्रिजेश ताठे,नगर तालुकाध्यक्ष सागर खरपुडे,किरण बनकर,आदि मान्यवर उपस्थित होते

