shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हास्तरीय रोल बॉल निवड चाचणीचे आयोजन ...


अहमदनगर जिल्हा रोल बॉल संघटना व श्रीरामपूर तालुका रोल बॉल संघटनेचा उपक्रम

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : ९ /   अहमदनगर जिल्हा रोल बॉल संघटना व श्रीरामपूर तालुका रोल बॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय १४ वर्षे खालील व वरिष्ठ महिला व मुले रोल बॉल निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे .

अहमदनगर जिल्हा रोल बॉल संघटने च्या वतीने  बुवा मंगल कार्यालय /सेंट झेविअर स्कूल, श्रीरामपूर येथे दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १०: ०० वाजता रोल बॉल स्पर्धानिवड चाचणी चे  आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे सचिव श्री. प्रदीप पाटोळे यांनी प्रसिद्धीस दिले ल्या पत्रकात म्हटले आहे. 
सदर स्पर्धेमधून रोल बॉल १४ वर्षमुले व मुली तसेच वरिष्ठ गट महिला व पुरुर्ष राज्य स्तर स्पर्धासाठी अहमदनगर जिल्हा संघ निवड होणार असून हा संघ आगामी होणार्या राज्यस्तर स्पर्धांमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिजिर्धात्व करणार असल्याची माहिती संघटने चे प्रशिक्षक व श्रीरामपूर तालुका रोल बॉल संघटनेचे सचिव श्री. आनंद पटेकर यांनी संगितले. रोल बॉल निवडचाचणी साठी वयोगट १४ वर्षमुले व मुली ज्यांचा जन्म दिनांक १/१/२००९ व त्या नंतरचे खेळाडू, तसेच वरिष्ठ गटासाठी खेळाडू वयवर्ष१७ वर्षव पुढील खेळाडू सहभाग घेवू शकतात.
रोल बॉल या भारतीय खेळा च्या प्रचार व प्रसार तसेच लहान स्कटेर्सना प्रोत्साहन  व रोल बॉल या खेळाविषयी आवड निर्माण होण्याकरिता संघटनेच्या वतीने स्पीड स्केटिंग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे स्पीड स्केटिंग साठी ६ वर्ष, ८ वर्ष, १० वर्ष१२ वर्षव खुला गट मुले व मुली टेनासिटी, कॉड्स, व ईनलाईन प्रकारात होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचे आव्हान संघटने च्या वतीने करण्यात आले. स्पर्धांच्या अजिर्धाक माहिती साठी संपर्क श्री. प्रदीप पाटोळे: 8275191771  व आनंद पटेकर: 9890744490 यांच्याशी संपर्क साधावा.
close