shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे सोनालिका कंपनीचा गुरुदत्त ट्रॅक्टर्सच्या वतीने भव्य असा शेतकरी मेळावा व बक्षीस वितरण सोहळा संपन्न.

इंदापूर येथे सोनालिका कंपनीचा गुरुदत्त ट्रॅक्टर्सच्या वतीने भव्य असा शेतकरी मेळावा व बक्षीस वितरण सोहळा संपन्न.     

सोनालिका ट्रॅक्टरच्या संदर्भात सोनालिका कंपनीचे बलजींदर सिसोदिया यांनी केले उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन. 
 इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ रोजी इंदापूर येथे सोनालिका कंपनीचा गुरुदत्त ट्रॅक्टर्सच्या वतीने भव्य असा शेतकरी मेळावा व बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
गुरुदत्त ट्रॅक्टर्स सरस्वतीनगर इंदापूर येथे सोनालिका कंपनीने आज दिवाळी व दसऱ्यातील ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केली त्यांच्यासाठी लकी ड्रॉ घेतला व त्यातून  पाच ग्रॅम सोन्याचे नाणे वरकुटे येथील पिराजी मिसाळ या शेतकऱ्यास मिळाले. तसेच सोनगाव येथील रामचंद्र आवळे यांना फ्रिजचे बक्षीस मिळाले. तर मोहन शिंदे कळाशी यांना ५० ग्रॅम चांदी तसेच राहुल सोनवणे सतीश मिसाळ व अजित पाटील यांना प्रत्येकी २५ ग्रॅम चांदीचे नाणे बक्षीस मिळाले.                      
 या कार्यक्रमासाठी सोनालिका कंपनीचे बलजींदर सिसोदिया ,बाळासाहेब गरजे, राहुल कोठाणे, सचिन दराडे अक्षय दिवेकर ,शुभम घोरपडे नितीन कोद्रे उपस्थित होते.                       
यावेळी सिसोदिया,  बाळासाहेब गर्जे, नितीन कोद्रे, अक्षय दिवेकर यांनी ट्रॅक्टर संदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच नानासाहेब खरात यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात शेतकऱ्यांना सांगितले की आपणाला ट्रॅक्टर संदर्भात व इतर गोष्टीत कधीही काही अडचण आली तरी आम्ही ती सोडवण्यास तत्पर आहोत.  
आजच्या या भव्य शेतकरी मेळाव्यातून सोनालिका कंपनीचे सहा ट्रॅक्टर विक्री करण्यात आले. त्याचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
            
यावेळी शेतकरी वर्गातून हनुमंत यमगर , संजय मासाळ ,वसंत आरडे, अजय देवकर व इतर शेतकरी उपस्थित होते ,      

कार्यक्रमाचे नियोजन व प्रस्ताविक  गुरुदत्त ट्रॅक्टर्सचे नानासाहेब खरात यांनी केले. यावेळी  गणेश  शिंगाडे ,संजय तोरस्कर ,शांतीलाल भगत,अशोक गायकवाड, निलेश कवितके, अनिकेत जाधव, प्रदीप भोंग , उजमा शेख  व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
close