मोर्शी - जिल्हा समाजकल्याण
जिल्हा परिषद अमरावती यांचे आदेशानुसार व सामान्य रूग्णालय अमरावती व यांचे वतीने तसेच पंचायत समिती मोर्शी व उपजिल्हा रूग्णालय मोर्शी यांचे संयुक्त विद्यमाने दिव्यांग अस्मिता अभियानांतर्गत तालुका स्तरीय दिव्यांग तपासणी शिबीर उपजिल्हा रूग्णालय मोर्शी येथे नुकतेच संपन्न झाले.
या शिबिराचे अध्यक्ष डॉ.सचिन कोरडे (वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रूग्णालय मोर्शी), उज्ज्वला ढोले ( गटविकास अधिकारी मोर्शी ),देशमुख प्रकल्प अधिकारी मोर्शी; राजेंद्र देशमुख (जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ) दिलीप वसु,डॉ.सतिश हुमणे ,डाॅ. शशिकांत फसाटे (अस्थिरोग तज्ञ ) , डाॅ.स्वाती सोनोने ( मनोविकार तज्ञ ), प्रमोद भक्ते ( दिव्यांग विभाग), डाॅ. संतोष भोंडवे (नेत्ररोग तज्ञ)हे प्रामुख्याने उपस्थित होते.
दिव्यांग बांधवाची जिल्हा सामान्य रूग्णालय अमरावती येथील तज्ञ डॉक्टरकडून तपासणी करण्यात आली. शिबीराला दिव्यांग बांधवाकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. काही दिवसानंतर दिव्यांग प्रमाणपत्र वितरित केल्या जाईल. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य विस्तार अधिकारी जयंत गारले तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राजूभाउ हुड यांनी केले.
यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचारी श्री.विनय शेलुरे तसेच श्री.सदाशिव हुलगुंडे,योगेश गवई,प्रशांत बेहरे,खान, सुधाकर भिवगडे, मालती पाटील ,शुभांगी चव्हाण, लवलेश भोजने, रोहित पोकळे, अमित आहाळे, प्रेमलता बोबडे, शितल वाघोडे,कल्पना गुडघे यांनी परीश्रम व सहकार्य केले.

