निमसाखर गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभाची जय्यत तयारी- सरपंच धैर्यशील रणवरे पाटील यांनी दिली माहिती.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील नीरा नदी किनारी वसलेले निमसाखर या गावच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभाचे आयोजन गुरुवार दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आले आहे. त्याची जय्यत तयारी सुरू असून या समारंभामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत १७ कोटीच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ व गावातील इतर ७ कोटी ८० लाख रुपयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते व माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती निमसाखर गावचे सरपंच धैर्यशील रणवरे- पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य व माजी बांधकाम सभापती प्रवीण माने, प्रशांत पाटील, अमोल पाटील, सचिन सपकळ, हनुमंत कोकाटे, श्रीमंत ढोले, दीपक जाधव, हनुमंत बंडगर, अभिजीत तांबिले, बापूराव शेंडे, लक्ष्मणराव शिंगाडे, दशरथ डोंगरे, अभिजीत रणवरे, अतुल झगडे, छायाताई पडसळकर, शुभम निंबाळकर, सागर मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे माहिती सरपंच धैर्यशील रणवरे पाटील यांनी दिली.
या तसेच या कार्यक्रमासाठी निमसाखर गावचे उपसरपंच विद्याताई रणवरे, ग्रामपंचायतचे सदस्य नंदकुमार रनवरे, राजेंद्र रणमोडे, शेखर पानसरे, गोरख शेळके, स्वाती लवटे, शहानुर मुलानी, सिंधू घोडके, नीता माने, अलका जाधव ,जयश्री अडसूळ, सुधीर भोसले, ग्रामसेवक सुधाकर भिलारे हे उपस्थित राहणार आहेत.

