shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोयल महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी"स्पर्धा परीक्षा" संदर्भात मार्गदर्शन पर व्याख्यान संपन्न!"-व्याख्यानास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!


"महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन/गुंतवणूक व्यवस्थित केली तर त्याचा परतावा योग्य प्रकारे मिळेल!" मा.श्री .सुधीरअडसूळ-(विक्रीकर निरीक्षक)

    दापोडी, पुणे. येथील जनता शिक्षण संस्थेच्या
"श्रीमती सी.के‌.गोयल कला आणिवाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी "स्पर्धा परीक्षेची तयारी!"या विषयावर मा .श्री. सुधीर अडसूळ (विक्रीकर निरीक्षक) यांचे मार्गदर्शन पर व्याख्यान बुधवार दि.  २३/११//२०२२ रोजी सकाळी ९:३० ते ११:०० या वेळेत महाविद्यालयाच्या सभागृहात महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.


        विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, भविष्याचे नियोजन व्हावे, स्पर्धा परीक्षा विषयी माहिती मिळावी, स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी, आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने सदर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष: प्रभारी प्राचार्य डॉ.सुभाष सूर्यवंशी हे होते.
       
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: प्रा. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी केले. प्रास्ताविक: प्रा परबतराव बैसाणे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात व्याख्यानाच्या आयोजनाची उद्दिष्ट स्पष्ट केला.

        प्रमुख मार्गदर्शक/ व्याख्याते मा .श्री. सुधीरजी अडसूळ सो. (विक्रीकर निरीक्षक) यांनी व्याख्यानामध्ये मार्गदर्शन करताना ते म्हणाले"महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेला सामोरे जाऊन प्रशासकीय अधिकारी व्हावे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेची गुंतवणूक व्यवस्थित केली तर त्याचा परतावा योग्य प्रकारे मिळेल, जिद्द सकारात्मक दृष्टिकोन आत्मविश्वास ,इच्छाशक्ती, वेळेचे नियोजन, परिश्रम, याच्या जोरावर कोणतीही गोष्ट प्राप्त करणे अवघड नाही" हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांविषयी माहिती दिली व अभ्यासाचे स्वरूप समजावून दिले.
     कार्यक्रमाचे संयोजन: महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग, यांच्या वतीने संयुक्तपणे करण्यात  आले.

    आभार: प्रा. बांबळे अनिता यांनी मानले. ‌
व्याख्यानासाठी प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे, डॉ. माने नागनाथ , प्रा. सिद्धार्थ कांबळे, वैभव डावखर,नेरकर राजेंद्र, अमरदीप गुरमे,  महेंद्र शिंदे,प्रितिश पठारे दिपाली खर्डे,पवार प्रियंका, वाणी रोहिणी, गोरड उत्तम, वैभव वरडुले, हे उपस्थित होते.
             कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मिळून एकूण ८८ व्यक्ती उपस्थित होते.
    कार्यक्रमाचा समारोप: "वंदे मातरम !"गीताने झाला.
close