प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रति निधी :-
केज तालुक्यात गेली पाच महिन्यापासून 10 के व्हीचा टान्सफार्मर तीन वेळा नादुरुस्त झाला आहे . परीनामी केज तालूक्यातील विज पुरवठा सुरुळीत नसल्यामुळे उद्दोग, शेती व्यवसाय , व्यापार , घरगूती या ग्राहकांना व सर्व सामान्य जनतेला आर्थिक मानसिक शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे .
या महावितरण च्या दुर्लक्षामुळे केज शहराचे व तालुक्यातील जनतेला अतोनात नूकसान व त्रास सहन करावा लागत आहे .
महावितरणच्या गलथान कारभारामुळे व्यापार शेती उद्योगधंदे हे ठप्प झाले आसून शेतातील पिके करपून जात आहेत सर्वांचीच नुकसान भरपाई ही महावितरण कंपनी देणार आहे का ?
10केव्ही एैवजी 5/5केव्ही चा टान्सफार्मर बसवून द्यावा अशीही जोरदार मागणी सर्व शेतकरी व व्यापारी यांनी केलेली आहे लेखी स्वरूपात आश्वासन दिल्यानंतर आज आंदोलन मागे घेतलेले आहे . दोन दिवसात विज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरणच्या कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा युवा नेते पशुपतीनाथ दांगट यांनी दिला आहे .
यावेळी उपस्थित असलेले राजेभाऊ लोंढे ,आरुण गुंड ,अमर पाटील , विनोद शिंदे ,समिर देशपांडे ,सूंदर नाईकवाडे ,बिपिनचंद्र ठोंबरे ,दिनकर राऊत ,आशोक राऊत , दलील इनामदार ,सुरेंद्र राऊत ,अभिजीत सत्वधर ,विष्णू राऊत ,बाळू इंगळे, अमोल वळसे ,सूर्यकांत चवरे ,भैया शिंदे ,चंद्रकांत गुंड ,रामधन नेहरकर , कैलास पवार ,सुनिल लोंढे ,अविनाश लोंढे ,गणेश आनेराव ,विष्णू नेहरकर , सतिश जवकर ,केपी शहा ,गोविंद जाजू ,बाळू लोकरे ,दिपक डापकर, चंदू सत्वधर ,बाळू सूर्यवंशी ,सचिन राऊत ,शिवाजी राऊत ,पोपट लोंढे, आत्माराम शिंदे ,पांडूरंग लोंढे ,शेख चॉद ,बाळू ठाने ,युवराज डबरे , भगिरथ दांगट , भिमा दांगट, भारत लोंढे , सखाराम सत्वधर व इतर असंख्य व्यापारी , शेतकरी उपस्थित होते.


