shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन. ई .एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निमसाखर विद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.

एन. ई .एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निमसाखर   विद्यालयात  संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.    इंदापूर प्रतिनिधी: एन. ई .एस. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज निमसाखर ता. इंदापूर जिल्हा पुणे येथील विद्यालयात आज शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला व २६/११/२००६ रोजी मुंबई येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जे जवान  शहीद झाले त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य चंद्रकांत गोपाळराव रणवरे व पर्यवेक्षक मधुकर शंकरराव खरात यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोमनाथ भानुदास चौधर सरांनी विद्यार्थ्यांना संविधानाविषयी माहिती दिली .त्यावेळी इयत्ता नववीतील विद्यार्थिनी साक्षी नामदेव सोलंकर हिने सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या समवेत संविधानाचे वाचन केले. तसेच मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना व निष्पाप नागरिकांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले तर निवेदन आजिनाथ मालगुडे सरांनी केले.
close