तमाम महाराष्ट्राला पुन्हा डिवचायचे काम महाराष्ट्र द्रोही महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी एकदा नाही दोनदा नाही तिस-यांदा केले आहे,...का खपवून घ्यायचं आम्ही आणि कशासाठी,..कोण हा कोश्यारी , कुठून आलेला,याचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध,..या येड्याला राज्यपाल पद पेलवत नसेल तर राजीनामा द्यावा ना,.किंवा भारतीय जनता पार्टी ने याची हकालपट्टी करावी,...
कायमच शिवरायांच्या विषयी अपशब्द बोलायचे ,.. वातावरण जाणुनबुजून गढूळ करायचे आणि नंतर मला असं बोलायचं नव्हतं,माझ्या वाक्यातील शब्दांचा विर्पयास केला,.मी माफी मागतो,. अणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे नेते उपनेते मिडिया समोर येवून सावरायला सुरवात करतात,.. म्हणजेच छत्रपती शिवरायांचे अपमान झाला हे खोडून काढत कोश्यारीची बाजू घेत आम्ही पुन्हा रयतेला वेड्यात काढलं ,.जसे आज महोदय मुनगंटीवार साहेबांनी सावरासावर केली ती अतिशय सहजपणे महाराष्ट्रद्रोही कोश्यारीची बाजू समर्थन करत नकळत पणे मांडलीच,..पण मी ईशारा देतो आम्ही काही षंड नाही,.. ॲक्शन ला रियाक्शन देणारच,..आता निषेध करण्याची मुभा संपली आहे,..मी तमाम महाराष्ट्रातील रयतेला विनंती करतो,.. शिवरायांच्या बद्दल आज जे राज्यपाल कोश्यारी बोलले ते मान्य आहे का,..? राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल आजपर्यंत ईतके बदनामीकारक बोलूनही पाठीशी घालणारे सत्तापिपासू आपण खपवून घेणार का..?
मी शिवसैनिक व मराठा युवक म्हणून आणि मराठी माणूस म्हणून कडक शब्दात निषेध व्यक्त करतो....
जय शिवराय जय महाराष्ट्र
लेखन - भरत मोरे

