shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा काझड शाळेचा डंका

यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात तालुकास्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा काझड शाळेचा डंका

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत मिळविले घवघवीत यश !!
इंदापूर प्रतिनिधी:पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांचे संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव येथे करण्यात आले होते.या महोत्सवात ११ प्रकारच्या कला क्रीडा स्पर्धांमध्ये तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे अठराशे विद्यार्थी सहभागी झाले होते.*प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.* या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा काझड या शाळेने *लोकनृत्य स्पर्धेत लहान व मोठ्या गटात सलग चार वर्षे प्रथम क्रमांक पटकावला आहे.*
यंदाही प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे.या स्पर्धेत काझड शाळेने चांगली कामगिरी केली आहे.
स्पर्धेतील काझड शाळेच्या विजयी संघाची कामगिरी
१) लोकनृत्य स्पर्धा (मोठा गट)
*प्रथम क्रमांक*
२)लोकनृत्य स्पर्धा (लहान गट)
*प्रथम क्रमांक*
 ३) खो-खो स्पर्धा (मोठा गट मुली)- *द्वितीय क्रमांक*
४) खो-खो स्पर्धा (लहान गट) *तृतीय क्रमांक*
५) लांब उडी स्पर्धा (मोठा गट-मुली)
*कु.श्रुती शिंदे -द्वितीय क्रमांक* 
६)गोळा फेक स्पर्धा  (मोठा गट मुले)
*रेवन शिंदे --तृतीय क्रमांक* 
७) उंच उडी स्पर्धा (मोठा गट मुले)
*श्रेयश झगडे द्वितीय क्रमांक*
यशस्वी विद्यार्थ्यांचे गटविकास अधिकारी *विजयकुमार परीट,* गटशिक्षणाधिकारी *राजकुमार बामणे* , केंद्रप्रमुख *मारुती सूपुते* , *ग्रामपंचायत काझड* , *शाळा व्यवस्थापन समिती काझड* , शिक्षक सोसायटी मा.चेअरमन व मुख्याध्यापक *आदिनाथ धायगुडे*, *गजानन माने*, *राजेंद्र शिंदे*, *शहाजी म्हेत्रे*, *शिवाजी लाळगे*,*अतुल धायगुडे*, *राजकुमार माळवे*, *संजिवनी सिताप* यांनी अभिनंदन केले आहे.
लोकनृत्य स्पर्धेसाठी कोरीओग्राफीचे उत्कृष्ट काम शाळेतील शिक्षिका *संजिवनी सिताप* यांनी केले.त्यांना सर्व शिक्षक बंधूंनी सहकार्य केले.
*पालक व ग्रामस्थांनी विजयी खेळाडूंचे कौतुक केले.*
close