shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भव्य बुद्धिबळ स्पर्धेत इंदापूर चषकाचा सोलापूरचा खेळाडू विरेश शरणार्थी ६.५ पॉइंट्स मिळवून ठरला मानकरी.

भव्य बुद्धिबळ स्पर्धेत  इंदापूर चषकाचा  सोलापूरचा खेळाडू विरेश शरणार्थी  ६.५ पॉइंट्स मिळवून ठरला  मानकरी.
                           
नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने प्रथमच भव्य बुद्धिबळ स्पर्धां संपन्न.                                                        
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर येथे दि. १३ नोव्हेंबर २०२२
शहा नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने पुणे जिल्हा चेस सर्कल यांच्या मान्यतेने इंदापूर शहरात प्रथमच भव्य बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. डीप माईंड चेस अकॅडमी यांनी या स्पर्धेचे आयोजन शहा नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने केले होते.
यावेळी उद्घाटनपर भाषणात स्पर्धकांना शुभेच्छा देताना भरतशेठ शहा यांनी बुद्धिबळ खेळाचे महत्व व या खेळात असणाऱ्या संधी तसेच शैक्षणिक प्रवासात खेळाडूंना असणाऱ्या विशेष सुविधा यांचा उल्लेख केला.
          बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन शहा नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भरतशेठ शहा, ट्रस्टचे विश्वस्त अंगद शहा आणि निवासी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी झाले होतेच पण त्याचबरोबर तामिळनाडू, कर्नाटक इत्यादी राज्यातून देखील एकूण १५७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धा खुला प्रवर्ग, पंधरा वर्षाखालील प्रवर्ग व दहा वर्षाखालील प्रवर्ग या तीन गटात खेळवण्यात आली. स्पर्धेत एकूण ७ फेऱ्या झाल्या.   अध्यक्ष भरतशेठ शहा, बारामती शहर पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, इंदापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी रामराजे कापरे , सौ.भाग्यश्री इंगळे, शहा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अंगद शहा आणि LBHM चे अध्यक्ष नागनाथ हळकुडे यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. एकूण ६.५ पॉइंट्स मिळवून इंदापूर चषकाचा मानकरी सोलापूरचा खेळाडू विरेश शरणार्थी ठरला. त्याला १०,०००/- रुपये रोख व चषक सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पुण्याच्या ओम लामकाने याने पटकावले तर तृतीय क्रमांक मानस गायकवाड यांना मिळाला. पंधरा वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक श्रेया हिप्पर्गी, द्वितीय क्रमांक अपूर्व देशमुख आणि तृतीय क्रमांक आदित्य चव्हाण तसेच १० वर्षाखालील गटात सानवी गोरे, द्वितीय क्रमांक वेदांत काळे व तृतीय क्रमांक अनय महामुनी यास मिळाला. तसेच इंदापूर मधील स्पर्धकांमध्ये अनुक्रमे सार्थक गायकवाड, श्रीराज देवडे,गणेश साळुंखे यांना दिले. सर्वोत्कृष्ट शाळा हे बक्षीस प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडीला मिळाले.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीप माईंड चेस अकॅडमी चे दिपंकर कांबळे यांनी केले. इंदापूर नगरपालिकेच्या कर निरीक्षक श्रद्धा वळवडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वेळात वेळ काढून सर्वतोपरी मदत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.श्रेयस कांबळे यांनी केले. ही  स्पर्धा फिडे चेस ऑर्बिटर शार्दुल तपासे यांच्या देखरेखी खाली पार पडली. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गायत्री कुलकर्णी, शुभम कांबळे, उद्धव पाटील, संध्याराणी सस्ते-चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
close