shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव देणार - विक्रम (बप्पा) मुंडे..!!

रेणूका ईंडस्ट्रीज गूळ उद्योगाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ..!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रति निधी   ;-

ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांना  मागील वर्षातील गळीत हंगामात प्रचंड नूकसान होत आसल्याने गूळ उद्योग तोट्यात आसताना देखिल या भागातील ऊस उत्पादक शेतकर्यांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने रेणूका ईंडस्ट्रीज (गुळ उद्योगाने) ऊसाचे प्रचंड गाळप केले आहे.दरम्यान चालु गळीत हंगामात देखिल ऊस उत्पादक शेतकर्यांना योग्यभाव देणार आसल्याचे प्रतिपादन बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांनी गळीत हंगामाच्या शुभारंभा प्रसंगी केले आहे.

आज रेणूका ईंडस्ट्रीज (गुळ उद्योग) सारूळ (आंबळाचे बरड) गळीत हंगाम २०२२-२०२३ चा शुभारंभ बीड जिल्हा परिषेदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम (बप्पा) मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बप्पासाहेब घुगे यांची उपस्थिती होती. ह.भ.माऊली महाराज बरडकर,ह.भ.प.केशव माहाराज शास्त्री यांनी गळीत हंगामाला आशिर्वाद दिले.गळीत हंगामाची सत्यनारायण पुजा प्रा.माधुरीताई व विजयकांत (भैय्या) मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाली.

प्रसंगी देवगावचे सरपंच अतुल (दादा) मुंडे,केज पंचायत समितीचे माजी सदस्य अशोक चाळक,लव्हुरीचे माजी सरपंच पंडीत चाळक,नामदेवराव खाडे,माजी सरपंच हरिदास मुंडे,माजी सरपंच रामभाऊ मुंडे,अॅड.घुले साहेब,अॅड.नवनाथ मुंडे,आर्जुन तांदळे,राधाकिसन मुंडे,विठ्ठल मुंडे,विड्याचे ग्रा.पं.सदस्य डाॅ.धनराज पवार,कोरडेवाडीचे ग्रा.पं.सदस्य दत्ता गित्ते,फौजी धनराज ठोंबरे,रजनिकांत गदळे,किशोर देशमुख,उत्तम आंधळे,सहादेव घोळवे,बळीराम चाळक,भिकचंद दराडे,बाबा काकड,बारीकाराव भोसले,लिंबराज ठेंगे,दत्ता चाळक,केशव मोराळे,बाळु मोरे,सोनू गायकवाड यांच्यासह परिसरातील उस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close