shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतात आणखी दहापट डॅाक्टर निर्माण होण्याची गरज-प्रा.ईश्वर मुंडे,चिं.ज्ञानेश्वर विष्णू तिडके यांचा सत्कार संपन्न..!!


प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी   :-

इंग्लंड,अमेरिका,जपान व जर्मनी या पाश्चिमात्य सुधारित देशात चाळीस व्यक्तींच्या प्रमाणात एक डॅाक्टर उपलब्ध आहेत.या मुळे तेथील व्यक्तींचे आरोग्य चांगले असून त्यांचे सरासरी आयुष्यमान ८० ते ९० वर्षे आहे. 

     




आपल्या विकसनशील भारत देशात चारशे व्यक्तींच्या प्रमाणात एक डॅाक्टर उपलब्ध आहेत.  या मुळे सध्या तरी भारत देशात सर्व सामान्य व्यक्तींना उच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध नाही.या मुळे भारतीयांचे सरासरी आयुष्यमान ६५ वर्षे आहे.

           

सर्व सामान्य व्यक्तींना उच्च दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी भारत देशात सध्याच्या तुलनेत दहापट प्रशिक्षीत डॅाक्टर निर्माण होणे गरजेचे आहे.

    

यासाठी केंद्र सरकार व सर्व राज्य सरकारांनी सामुहिक प्रयत्न करून जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थांना कमीत कमी फीस मध्ये वैद्यकिय पदवी शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.

    

मागील दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीत आपल्या देशाची आरोग्य सेवा किती कमकुवत आहे याचा प्रत्यय देशभरातील जनतेने अनुभवलेला आहे.अशी वाईट वेळ या पुढे येऊ नये म्हणून आरोग्य विभागात आमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा.ईश्वर मुंडे, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी (ओबीसी सेल) महाराष्ट्र राज्य यांनी दिंद्रूड येथे केले.

      

दिंद्रूड येथील प्रसिध्द डॅाक्टर विष्णू वामनराव तिडके यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर तिडके यांचा एम.बी.बी.एस.पदवी साठी डी.वाय.पाटील वैद्यकिय महा विद्यालय,कोल्हापूर येथे प्रवेश झालेला आहे.या मुळे आयोजित छोटेखानी सत्कार प्रसंगी प्रा.ईश्वर मुंडे बोलत होते.

      

सत्कार समारंभास धारूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र सोळुंके,लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी  साखर कारखाना,तेलगाव चे तज्ञ संचालक शिवाजीराव बडे,दिंद्रुड येथील डॉ. दत्ता भुजबळ डॉ. सतीश जाधव, डॉ.तांबडे, संगम चे सरपंच भगवानराव कांदे,चिखलीचे सरपंच विलासराव शेंडगे,राघव ज्वेलर्सचे प्रोपरायटर राजेभाऊ सोळंके,रा.कॅा.पा.चिखलीचे  कल्याण सोळंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सागर,लोकशक्ती विद्यालयाचे सहशिक्षक रामानंद तिडके, संतोष शिंदे,श्रीराम ठोंबरे आदि उपस्थीत होते.

 

 सर्वांनी चि.ज्ञानेश्वर विष्णू तिडके यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणास शुभेच्छा दिल्या. या वेळी डॅा.विष्णू वामनराव तिडके यांनी सर्वांचे आभार मानले.

close