यावेळी सरडेवाडी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रशांत सरडे यांचा वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी मेजर कैलास गवळी , मेजर मोहन वायकर, मेजर शिवाजी भानवसे ,मेजर बाजीराव शिंदे, मेजर रविराज पवार, मेजर सिताराम हजारे , धरमचंद लोढा बाळासाहेब शिरसागर , मोरेश्वर कोकरे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत शिताप यांनी बोलताना एका माजी सैनिकाच्या मुलाने डॉक्टर होणे हे मोठे अभिमानास्पद असल्याने आम्ही त्यांचा सर्वांच्या वतीने सत्कार करून अभिनंदन कौतुक करीत आहे. तसेच मेजर कैलास गवळी यांनी माजी सैनिकाच्या मुलाने डॉक्टर होऊन समाजासाठी २४ तास सेवा करावी आम्हाला अभिमान आहे की आमच्या सारख्या माजी सैनिकाचा मुलगा डॉक्टर होऊन सर्वांची सेवा करेल त्याच्या भावी वाटचालीस सर्व आजी माजी सैनिकांच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.

