1)
इंदिरा गांधी..
भारताच्या पहिल्या
स्वयंभू पंत प्रधान
अखिल महिलांचा
सर्वोच्च हो सन्मान
पंडीतजीचा वारसा
ते बाळकडू रसपान
उच्चशिक्षाविभुषीत
सद्चरित्रआरस्पान
रे गरीबी हटाव नारा
डोळ्यां प्रगत सपान
आणीबाणी जाहीर
ठेवे परिस्थिती भान
अनुभव तो गाठीला
सदैव राखे अवधान
युध्दात जयजयकार
जगत सारे सावधान
शंभर देशांचे नेतृत्व
भारतरत्न बुध्दीवान
बांगला देशा सावरी
हादरले पाकिस्तान
राजनिती कशी हवी
अनमोल रत्नखदान
शहीद होई माताश्री
समर्पित ते खानदान
आयर्न लेडी सन्मान
भारत भू अभिमान
नवइतिहास निर्माण
उदी सुगंधी लोभान
2)
इंदिराजी ..
जन सेवेला समर्पित
अवघी काही घराणी
नेहरु परिवारां शोभे
इंदिरा गांधी धुराणी
महिलापंतप्रधान त्या
स्फुर्तीदायक कहाणी
बुध्दीवानभारतकन्या
रे मुरब्बी राजकारणी
बांगला युध्दा दिसली
पाऊले तिची धोरणी
शंभर देशांचे नेतृत्वा
झळाळी रण रागिणी
एकचं चुकले पाऊलं
लादलेलीआणीबाणी
हरुनि परत जिंकली
दाखविले तिने पाणी
कर्तुत्वा करी सलाम
इतिहास राही ऋणी
आयर्नलेडी खणखर
भले समोर हो कुणी
विरोधक आपसूकचं
करे कैक वाखाणणी
सडेतोड उत्तरे तयार
करारी खंबीर वाणी
3)
इंदिरा जी ..
इंदिरा गांधी माणीक
भारत देशा कोंदणी
इतिहास अवकाशात
चकाके सदा चांदणी
जपे सामान्याचे हीत
बॅंकांचे राष्ट्रीयकरणी
सर्व धर्म समभावात
समतोलविचारसरणी
गरिबी हटाव मोहीम
योजना आखे धोरणी
नेहरु परिवाराने दिले
अमोल मोती रांजणी
मृदुलति घेई पित्याची
बने वेळी रणरागिणी
अनेक वार झेललेले
लागू करे आणीबाणी
हरली पुनश्च जिंकली
आगळे नर्मदेचे पाणी
थांग ना लागे मनाचा
करारी स्नेहाळ वाणी
इतिहास सुवर्ण पानी
काळाचे राहे स्मरणी
अखर्वात एखादअशी
तलवार हो खणखणी
4)
इंदिरा गांधीजी .
भारतरत्न इंदिराजी
जागे सदा आठवणी
काटेरी सिंहासनावर
मुर्ती विराजे देखणी
सर्वोच्च पदस्थ नारी
मुत्सद्दी राजकारणी
पाकविरूद्ध युध्दात
जागली रण रागिणी
प्रगतीला मिळे गती
दूरदर्शी ती आखणी
बॅंकाचे राष्ट्रीयीकरण
जन तव सदैव ऋणी
हिरा चपखल चमके
भारत भूमी कोंदणी
गुणांचे जाहले चीज
भरूनि वाही रांजणी
गर्भ श्रीमंतीत असूनि
वेदनादीनांच्या जाणी
गरिबी हटाव विचारां
कार्यशैली वाखाणणी
आत्मघातकी हल्ला
गमावली सारथीगुणी
आता उरल्या केवळ
आठवणी क्षणो क्षणी
५)
प्रियदर्शिनी ..
अद्वितीय इंदिराजी
सदैव राही स्मरणी
विरोधकही झुकती
अंतीम तुमचे चरणी
कोमल कवि कन्या
कणखर वज्रधोरणी
उच्च पदस्थ महिला
सक्षम राज कारणी
विजयाचे शिल्पकार
बांगलादेश उभारणी
मुत्सद्दी मुरब्बी अति
दूरदर्शी अन् धोरणी
गरिबीहटाव ना-यात
सिध्द विचार सरणी
दूरितांचे जपले हित
बॅंकांचे राष्ट्रियीकरणी
अणुशक्तीत संपन्नता
आठव देई पोखरणी
दीनदलिताचा कणव
दिसला मनपुष्करणी
आपण गेला उणीव
जाणीव प्रती चरणी
भारत रत्न सुशोभित
धन्य धन्य हो धरणी
६)
प्रिय इंदिराजी ..
अद्वितीय इंदिराजी
सदैव राही स्मरण
करा नाम उच्चारण
अंगी वेगळे स्फुरण
देशा विदेशात डंका
कणखर वज्र धोरण
उच्च पदस्थ महिला
सत्चिल राजकारण
विजयाचीशिल्पकार
बांगलादेशा उभारण
मुत्सद्दी मुरब्बी अति
दूरदर्शी अन् धोरण
गरिबीहटाव ना-याने
करती जन जागरण
दूरितांचे जपले हित
बॅंकांचे राष्ट्रियीकरण
अणुशक्तीत संपन्नता
साक्ष देतो पोखरण
दीनदलिताचा कणव
सुकोमल अंतःकरण
आपण गेला उणीव
जाणीव प्रत्येकचरण
बलिदान तव अपूर्व
जिंकून घेतले मरण
- हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६.
www.kavyakusum.com

