इंदापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या सन्मान सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव प्रविणसिंह परदेशी येणार वालचंदनगरला .
इंदापूर : प्रतिनिध: वालचंदनगर (ता.इंदापुर ) परिसरामध्ये इंदापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजीत केलेल्या सन्मान सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव प्रविणसिंह परदेशी पहिल्यांदाच येत आहेत.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वालचंदनगर लगतचा भाग छोटे मोठे वर्कशॉप मुळे 'मिनी एमआयडीसी' म्हणून ओळखला जातो. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सन्मान सोहळ्याचे रविवारी दि.२७ रोजी वालचंदनगर येथील गणेश हाॅल येथे सकाळी ११:३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सन्मान सोहळ्यासाठी नरेंद्र मोदी यांचे सचिव प्रविणसिंह परदेशी वालचंदनगर नगरीमध्ये येत आहेत. परदेशी हे प्रथमच येत असल्याने या परिसरातील उद्योजक, व्यावसायिक , नोकरदार , वृत्त संकलन करणारे माध्यमांचे प्रतिनिधी सह प्रशासनातील अधिकारी या कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत. नुकतेच परदेशी यांना इंदापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या सन्मान सोहळ्यासाठी प्रत्यक्ष भेटुन निमंत्रण देण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते विजय कांबळे , निमसाखर येथील बातमीदार संतोष दहिदुले, वार्ताहर अमोल रजपुत , बातमीदार सत्यजित रणवरे हे उपस्थित होते.

