लोकनेत्या पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर व राजाभाऊ मुंडे यांनी धारुर बाजार समितीवर भाजपचा एकहाती झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय प्राप्त केला असून आ. प्रकाश सोळंके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 01जागेवर समाधान मानावे लागले आहे.
ग्रामपंचायत मतदारसंघात 72 तर सोसायटी मतदारसंघातील उमेदवारांनी तब्बल 60 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवून भाजपची एकहाती सत्ता धारुर बाजार समितीवर निर्माण केली आहे. भाजपचा हा एकहाती विजय आ. प्रकाश सोळंके यांना मोठा धक्का मानला जात असून ही माजलगाव मतदारसंघातील परिवर्तनाची नांदी आहे.
अशी चर्चा माजलगाव मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेतून ऐकावयास भेटत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रमेश आडसकर व राजाभाऊ मुंडे एकञ आल्यास असे निकाल खाञीशिर लागतील व माजलगाव मतदारसंघात नक्की परिवर्तन घडेल अशी मोठ्या प्रमाणात सद्या चर्चा सुरू झाली आहे.

