मा.कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब यांना भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा अहमदनगर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनातील प्रमुख मागण्या
1)महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगारासाठी मंडळाने सुरु केलेली घरकुल योजना 2 लाख रु अनुदान असलेली तात्काळ सुरु करून ज्या कामगारांना स्वतःच्या मालकीची जागा नाही त्याकरिता घर् बांधणीसाठी सरकारी जागा उपलब्ध करून देण्यात यावी.
2) नगर पंचायत ,नगर परिषद येथील सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी यांची 2005 पासून बंद असलेली पेन्शन योजना सुरु करावी.
3) लाडपागे वारास हक्काच्या नोकऱ्याच्या प्रलंबित प्रकरणे निकाली काढून सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकऱ्या मिळाव्यात.
4) साईबाबा संस्थान मधील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 598 कर्मचाऱ्यांना 1052 कर्मचाऱ्यांप्रमाणे कायम करावे.
यावेळी उपस्थित भारतीय मा खाजदार भाऊसाहेब वाकचौरे जनता पार्टी कामगार मोर्चा अहमदनगर प्रभारी नानासाहेब शिंदे,भाजपा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण,भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस निवृत्ती जावळे, नेवासा तालुका अध्यक्ष विवेक नन्नवरे,रामदास वाकचौरे,गणेश शंकर बिराडे, राहुल आढगळे,पोपट शेकडे,बाळासाहेब लोखंडे,कादिर पठाण,बाळासाहेब आरगडे, आयाज सय्यद, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

