shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी ग्रामपंचायत ग्रामसभा प्रौढ , महिला व युवकांच्या उपस्थिती संपन्न.

वडापुरी ग्रामपंचायत ग्रामसभा 
प्रौढ , महिला व युवकांच्या  उपस्थिती संपन्न.

ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे यांनी अजेंड्या प्रमाणे विषयावार सविस्तर केली चर्चा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील  वडापुरी ग्रामपंचायत ग्रामसभा दि. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी बालसभा ,महिला सभा , अनुसूचित जाती -जमाती , वंचित घटकांची व ग्रामसभाचे आयोजन करण्यात आले होते.सदर सभा श्रीनाथ मंदिरामध्ये घेण्यात आली .सभेमध्ये गणपूर्ती झाल्याचे पाहून  ग्रामसेवक नंदराज संपत चंदनशिवे  यांनी सभेचे अध्यक्ष स्थानी गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ . संगीता श्रीमंत तरंगे यांची निवड करण्यात आली .सदर सभेमध्ये  महिला,प्रौढ नागरिकांनसह  युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती .या सभेमध्ये ग्रामसेवक यांनी ग्रामसभेच्या अजेंड्या प्रमाणे विषयावरती सविस्तर चर्चा करण्यात केली यामध्ये विषय क्रमांक १)सन २०२३- २४ गावचे अंदाजपत्रक चे वाचन करण्यात आले. .२)२०२३-२४ महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना लेबर  बजेट यावरती विविध वैक्तिक व सामूहिक योजनांची माहिती देण्यात आली .आणि सर्व  पात्र लाभार्थी यांनी या मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.३ )सन २०२३-२४ पंधरावा केंद्रीय वित्त आयोग गाव विकास आराखडा बाबतीत सर्व शासनाच्या गाईडलाईन नुसार विविध विकास कामांचा समावेश व सर्व समावेशक आराखडा तयार करण्यात आला .४)प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना पात्र लाभार्थी ची निवड करण्यात आली व यादीचे वाचन करण्यात आले.
close