शिर्डी (संजय महाजन ) - कला साहित्य क्षेत्रातील लेखक कवी व संपादक साहेबराव नंदन नाशिक यांना उत्कृष्ट निवेदक व कविता सादरीकरणासाठीचा पुरस्कार पुष्परत्न साहित्य समूहातर्फे प्रा. डॉ. आनंद अहिरे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
जीवनात आज पर्यंत अनेक सामाजिक सांस्कृंतिक कला विभागाचे असंख्य ऑनलाईन व ऑफ लाईन पुरस्कार सन्मान सोहळे प्राप्त झाले आहेत . वयाच्या साठाव्या वर्षी त्यांना नाशिक येथिल पुष्प रत्न साहित्य समुहाचा उत्कृष्ठ सुत्रसंचालन व कविता क्षेत्रात " साठीतही वाटे एकदा ' भेटून तीला घ्यावे ! ह्या मुक्त छंदातील कविता सादरीकरण केल्या बद्दल त्यांना मानाचे सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आज पर्यंत साहेबराव नंदन यांनी अनुकूल परिस्थिती असतांना सुद्धा कमी शिक्षणात देखील अप्रकाशित चार नाटकांचे अनेक प्रयोग केले आहेत . त्यांनी त्यांच्या जिवनात पत्रकारिता उत्तम लेखन समाज प्रबोधन प्रवचणाच्या माध्यमातून करत असताना अठरा विश्वे सुदामा भोगला आहे . पोटाची खळगी भरण्यासाठी चौकाचौकात ' सिग्नल वर ज्या प्रमाणे पोर ' बाया ' माणंस ' हाथात असेल ते विकून ' पुला खाली विसावा घेतात. अशा लोकांचे दुःख पाहून ' स्वःताचे दुःख विसरून ' नाही उतारा 'नाही सातबारा ' तरी रोज पाहातो सांज तारा ! आजमितीला साहेबराव नंदन यांच्या नावे कविता क्षेत्रातले ऑनलाईन शेकडो सन्मान पत्र ऑफ लाईन अनेक पुरस्कार मान पत्र प्राप्त झाली आहेत . त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ५० वर्षापुर्वीचा गावकुसाचा " गावगाडा " हा काव्यसंग्रह ' व सगरवंशिय जिरे माळी समाज बांधवांच्या जिवनावर आधारित " सगर रत्न विशेषांक भाग एक त्यांचे सहकारी ललित साळवे यांच्या जोडीने तसेच सगर दिपोत्सव दिवाळी अंकाचे लेखन संपादन संपादक म्हणून नोंद आहे.
" बोभाटा " व " कुटाणा " ह्यावर्षी त्यांच्या दोन लघुकथा संग्रह वाचकांच्या सेवेत येत आहेत . " साहेबराव नंबर यांना उत्कृष्ट निवेदक व कविता सादरीकरणाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व कविवर्यॲड संभाजी पगारे ' प्रा .डॉ .आनंद अहिरे ' ख्यातनाम साहित्यिक क्रांतीकुमार महाजन ' साहित्यिक तान्हाजी खोडे ' कवी ललित साळवे ' पत्रकार ' राजेंद्र गवळी ' अशोक पाटील, चंद्रकांत बागुल, सगर समाज बांधवांनी अभिनंदन केेले आहे .

