शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) सामाजिक बातमी
ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर लोणी काळभोर येथील डोंगर परिसरात १ लाख वृक्ष लागवड तसेच संवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे या अनुषंगानेच दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी साधना सहकारी बँक मा.व्हा.चेअरमन श्री.बाळासाहेब बापुराव कोळपे
यांच्या वाढदिवसानिमित्त करंज, वड,पिंपळ, चिंच, कडुलिंब, जांबुळ,लक्ष्मीतरू, खैर, बुच ,पाथोडिया ,
१०१ देशी वृक्ष लावुण वाढदिवस साजरा करण्यात आला. व ग्रीन फाऊंडेशन वृक्षसंवर्धन मोहीम साठि वाढदिवसानिमित्त ५० पीव्हीसी पाईप व ५ ठिंबक बडल देणार असल्याचे सांगितले आहे.
तसेच ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य लोणी काळभोर येथील ११ सभासदांनी श्री.बाळासाहेब कोळपे यांच्या वाढदिवसानिमित्त पुना ब्लड बँक येथे रक्तदान केले.
सर्व नागरिकांनी एक निश्चय केला पाहिजे की वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन असे उपक्रम राबवणे खुप गरजे आहे. निसर्ग संवर्धनाला सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे . ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून गेले ८ वर्षापासून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन चे कार्य आखड पणे चालू आहे प्रथम वृक्षारोपण करताना ठिंबक ची व्यवस्था करण्यात येते . खुप छान कार्य करत आहेत. असे प्रतिपादन बाळासाहेब कोळपे यांनी केले.
या वेळी ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, वन विभाग लोणी काळभोर, वनव्यवस्थापन समिती, जनाई शिक्षण संस्था, गिरीश विभा ट्रस्ट उपस्थित होते.

