प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
येडेश्वरी साखर कारखाना लिमिटेड खामगाव युनिट क्रमांक दोन सन २०२२- २०२३ च्या प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन येडेश्वरी साखर कारखान्याचे संचालक नामदेव (बापु) खराडे तसेच श्रीधर बाबा भवर यांनी केले.
दि.०२ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २:३० वाजता येडेश्वरी साखर कारखाना लिमिटेड खामगाव युनिट दोनचा प्रथम बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळा प.पु. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठत्र्यंबकेश्वर यांच्या शुभहस्ते व ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले अध्यक्ष राष्ट्रीय अखिल भारतीय वारकरी महामंडळ यांच्या शुभ आशीर्वादाने संपन्न होणार आहे.
येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास येडेश्वरी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, परिसरातील शेतकरी, मुकदम, गाडी मालक आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक नामदेव (बापु) खराडे, श्रीधर बाबा भवर यांनी केले आहे.

