shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब इंदापूर आयोजित इंदापूर प्रीमियर लीग आयपीएलचे उद्घाटन माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांच्या हस्ते संपन्न.

इंदापूर येथे गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब इंदापूर आयोजित इंदापूर प्रीमियर लीग आयपीएलचे उद्घाटन माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांच्या हस्ते संपन्न.

इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब इंदापूर आयोजित इंदापूर प्रीमियर लीग आयपीएलचे उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला. याचे उद्घाटन इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांच्या हस्ते व माजी नगरसेवक हरिदास हराळे , माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब व्यवहारे,स्वप्निल मखरे ,सुभाष खरे ,रमेश बनसोडे ,दिलीप शिंदे, ललेंद्र शिंदे, असलम मुलानी, समीर शेख, अनिल चव्हाण, समीर दुधनकर, दत्तू शिंदे, आमचे मेंबर मित्र परिवाराचे अनिल अण्णा पवार , नगरसेवक पोपट शिंदे, दत्तू शिंदे, आयोजक डोनाल्डो शिंदे व खेळाडू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
 गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब इंदापूर आयोजित इंदापूर प्रीमियर लीग आयपीएल सामने इंदापूर प्रशासकीय इमारती शेजारी १०० फुटी रोड नजीक भव्य पटांगणात या स्पर्धेचे आयोजन दिनांक ३० डिसेंबर२०२२ ते १ जानेवारी२०२३ पर्यंत करण्यात आले असून या स्पर्धेला प्रथम पारितोषक कर्मयोगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरतशेठ शहा व द्वितीय पारितोषक शंकर नाना भोंग यांच्यावतीने देण्यात आलेले आहे. तसेच इतर वैयक्तिक बक्षिसे ही अनेक मान्यवरांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. या क्रिकेट सामन्यासाठी अनेक मातब्बर क्रिकेट संघाने यात सहभाग नोंदवलेला दिसून आला आहे.
close