shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भरतशेठ शहा यांची इंदापूर शहर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी निवड.

भरतशेठ शहा यांची इंदापूर शहर व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी  निवड.

इंदापूर शहर व्यापारी महासंघाच्या कार्यकारणीची  निवड सर्वानुमते संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहर व्यापारी महासंघाची दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी बैठक पार पडली या बैठकीमध्ये व्यापारी महासंघाच्या सदस्यांचे व त्यांच्या अडीअडचणी संदर्भात एक संघ असावा या उद्देशाने निर्माण केलेल्या या व्यापारी महासंघाची कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सर्व व्यापारी सदस्यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. यामध्ये  कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर  ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.उपाध्यक्ष पदी संदीप वाशिंबेकर,सचिव पदी मेघशाम  पाटील .  खजिनदार पदी दिलीपशेठ कासार .सहसचीव पदी प्रशांत पवार,सहखजिनदार पदी सागर सुर्यवंशी,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी उपस्थिततांनी नवनिर्वाचित व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची  
ज्येष्ठांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
close