shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथील शेतकऱ्यांनी अनुभवला शेतीपूरक अभ्यास दौरा.

वडापुरी येथील  शेतकऱ्यांनी अनुभवला शेतीपूरक अभ्यास दौरा.

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने केले होते आयोजन.

प्रथमच गावातील शेतकऱ्यांनी शेतीविषयक अभ्यास दौरा काढल्याने शेतकरी झाले आनंदित.
इंदापूर प्रतिनिधी: सध्याच्या युगामध्ये अत्याधुनिक शेतीतील तंत्रज्ञान तसेच शेतीपूरक व्यवसाय याचे प्रात्यक्षिक गावाकडच्या शेतकऱ्यांना अनुभवास मिळावे या उद्देशाने पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर कृषी विभागाच्या वतीने वडापुरी गावातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. सदर अभ्यास दौऱ्यामध्ये वडापुरी गावातील महिला पुरुष शेतकरी ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी एकूण ४२ शेतकऱ्यांनी या दौऱ्यामध्ये सहभाग नोंदवत राहुरी विद्यापीठ येथे जाऊन प्रत्यक्ष शेती प्रकल्प पहाणी, शेती विषयक तंत्रज्ञान तसेच शेतीतील वेगवेगळ्या प्रयोगाचे यामध्ये भाजीपाला ,फळबाग लागवड, नर्सरी इत्यादी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले. याबाबत राहुरी विद्यापीठातील डॉक्टर अनिकेत चंदनशिवे यांनी माहिती दिली.
तसेच आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी भेट दिली असता या ठिकाणी ग्रामसचिवालय, गावातील विविध योजना यांची अंमलबजावणी कशा स्वरूपात केली, याबाबत माहिती व प्रत्यक्ष पाहणी घेतली, गावातील सुख सुविधा यांचे प्रत्यक्ष पहाणी यावेळी करण्यात आली. गावातील शेती व गावाच्या पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने केली आहे याचे निरीक्षण केले असल्याची माहिती ग्रामपंचायतचे ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे यांनी दिली.
हा अभ्यास दौऱ्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या मार्गदर्शनाखाली  पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेंद्र काळे, अजित घोगरे ,कृषी विस्तार अधिकारी शेख तसेच वडापुरी गावातील शेतकरी पुरुष महिला व ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. 
यावेळी त्यांनी आधुनिक शेतीचा संकल्पही केल्याचे सांगितले.
close