१ जानेवारीला वंजारी सेवा संघाचा होणार रत्नागिरीत दशकपूर्ती मेळावा.
समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे शेखर पानसरे यांनी केले आव्हान.
इंदापूर प्रतिनिधी: वंजारी सेवा संघ महाराष्ट्र सामाजिक संघटनेच्या दशकपूर्ती सोहळा व राज्यस्तरीय वंजारी समाज मेळावा रविवारी १ जानेवारी २०२३ रोजी रत्नागिरी येथील वीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती वंजारी सेवा संघाचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष व निमसाखर गावचे ग्रामपंचायत सदस्य शेखर पानसरे यांनी दिली.
वंजारी सेवा संघटनेला सध्या दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने दशकपूर्ती सोहळा व समाज मेळावा रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थित होणार असून अध्यक्षस्थानी माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून भटके विमुक्त चळवळीचे अभ्यासक तथा सदस्य नीति आयोग भारत सरकार दादा इदाते, माजी आमदार डॉक्टर नारायण मुंडे, माजी आमदार तोताराम कायंदे, भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड, माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर दीपाताई गीते, राजेंद्र राख व अरुण खरमाटे,वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर
यांची उपस्थिती आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी भटके विमुक्त चळवळ व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब या विषयावर दादा विधाते तर ओबीसी चळवळ व वंजारी समाज या विषयावर माजी आमदार डॉक्टर नारायण मुंडे मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेखर पानसरे यांनी केले आहे.

