shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आडसूळ टेक्निकल कॅम्पसतर्फे चास गावात वृक्षारोपण


प्रतिनिधी :  संजय वायकर

नगर : २४ /  चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम. पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोबतच महाविद्यालया तर्फे सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक उपक्रम आसपासच्या गावांमध्ये घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चास येते १२ डिसेंबर रोजी वृक्षारोपण करण्यात आले .

 डॉ. प्रदीप एम. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार कॉलेजमधील मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गणेश शिरसाट, प्रा. स्नेहिल गायकवाड, प्रा. बाबासाहेब इंगळे, प्रा. निलेश आठवले, संगणक विभागातील प्रा. सचिन भोंडवे, एमबीए विभागातील प्रा. गजानन नाईक व विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या वेळी चास गावचे सरपंच मा. ॲडव्होकेट राजेंद्र गावखरे, उपसरपंच मा. युवराज कारले, चेअरमन मा. भाऊ काळे, व्हाईस चेअरमन मा. सुभाष गवळी, मार्केट कमिटी संचालक मा. शिवाजी कारले, ग्रामपंचायत सदस्य मा. पोपटराव गुंगार्डे, माजी सरपंच रावसाहेब कार्ले उपस्थित होते. याप्रसंगी  व्हाईस चेअरमन मा. सुभाष गवळी यांनी कॉलेजमधील प्राध्यापकांचे आभार मानले.

महाविद्यालयाचे डायरेक्टर व प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले कि  निसर्गाने बनविलेले एक झाडही निरुपयोगी नाही. वृक्षारोपण करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. वृक्ष हे मानवी आयुष्य निरोगी, सुंदर आणि आनंदी बनवते. दरवर्षी वनमहोत्सव साजरा करून या योजनेत सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.

या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध माणिक आडसूळ, उपाध्यक्ष मा. श्री विश्वनाथ माणिक आडसूळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ  प्रदीप एम पाटील, उप प्राचार्य श्री किशोर जाधव, संगणक विभाग प्रमुख डॉ.हेमंत जाधव, एम.बी.ए विभाग प्रमुख डॉ.विश्वजित कांबळे , इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ.दिनेश अडोकर,  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा. संकेत शिंदे, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. पूजा साठे,डॉ.धन्यकुमार जैन यांनी कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
close