shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हिंदू समाजाचा लव जिहाद व धर्मांतरणाच्या विरोधात भव्य मुक मोर्चा केज मध्ये शांततेत संपन्न!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-राज्यात व देशात हिंदू धर्माविषयी द्वेषभावनेने हिंदू मुलींना प्रेमाचे नाटक करून फसवणूक करून पळवून नेणे व नंतर धर्मातंरण करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करणे नंतर त्यांच्या हत्या करणे किंवा त्यांना आयुष्यातून उध्वस्त करणाऱ्या विरोधात कठोर शासन करण्यासाठी तसेच लव जिहाद व धर्मांतरण रोखण्यासाठी कठोर कायदा करण्यासाठी केज येथे बुधवार दि २८ डिसेंबर रोजी समस्त हिंदू समाजाचा भव्य मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी ॲड तुकारामजी चिंचणीकर यांचे बौध्दिक पार पडले .




राज्यात व देशात लव जिहादच्या सातत्याने घटना घडत असून विविध माध्यमातून बातमी स्वरूपात सातत्याने समोर येत असतात याला कुठे तरी आळा घातला पाहिजे यासाठी कोणत्याही प्रकारे कोणीही दुसऱ्या धर्माच्या मुली व महिलाना प्रेमाच्या जाळ्यात ओढू नये यासाठी कठोर कायदा असावा तसेच धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे जबरदस्तीने असो किंवा मर्जीने कोणत्याही प्रकारचे धर्मांतरणास परवानगी नसावी . प्रत्येक हिंदू बांधवाने आपल्या माता भगिनीचे सोशल मिडीयावर इंन्स्टाग्राम , फेसबुक सारखे कशाला पाहिजे ते बंद करा कोणत्याही नावाने आपल्या भगिनीना कसलेही मेसेज आले नाही पाहिजे यासाठी आपणच लक्ष दिले पाहिजे असे ॲड तुकाराम चिंचणीकर पंढरपूर यांनी सांगितले 

प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतर धर्माच्या मधे कसलिही ढवळाढवळ करु नये तसेच लव जिहाद च्या नावाखाली अनेक तरुणीना फसवून नादाला लावून पुन्हा हत्या केल्या त्यांच्या गुन्हेगाराना तातडीने फाशी देण्यात येण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणी साठी समस्त हिंदू समाज बंधु भगिनीचा भव्य स्वरूपात मुकमोर्चा बुधवार दि २८ डिसेंबर रोजी भवानी मंदिर धारूर रोडपासून निघून  तहसील कार्यालया पर्यंत काढण्यात आला  , अतिशय शिस्तबध्द पणे व शांततेत मोर्चा काढण्यात आला तहसिलदार , पोलिस अधिकारी यांना निवेदन देऊन  शिव प्रेरणा स्तुतीने  मोर्चाची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आली या मोर्चास समस्त हिंदू बंधु, भगिनी उपस्थित होते .

close