इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेले सरपंच व सदस्य यांची नावा सहित यादी पहा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचतींच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अतिशय चुरशीने झालेल्या या गावपातळीवरील मतदानात तालुक्यात सरासरी ८३.७१टक्के मतदान झाले. यामध्ये एकूण ५४७६० मतदारापैकी ४८३५१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
इंदापूर तालुक्यात २६ ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी ७१ व या ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या २४६ सदस्या पैकी बिनविरोध झालेले ३३ जागा वगळता २१३ जागांसाठी ४७२ उमेदवारांचे मतदानरुपी भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंदीस्त झाले होते. आज मंगळवार (ता.२०) रोजी १० वाजले पासून मतमोजणी सुरू झाली होती.तर सर्व ग्रामपंचायत निकाल दुपारपर्यंत स्पष्ट झाले.
यादी खालील प्रमाणे:

