shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांना पळसदेव येथे ग्रामस्थ व सर्व पक्षीयांनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांना पळसदेव येथे ग्रामस्थ व सर्व पक्षीयांनी वाहिली श्रद्धांजली
इंदापूर प्रतिनिधी: भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे ०३.३० वाजता दुःखद निधन झाले. इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील ग्रामस्थ आणि सर्व राजकीय पक्षांच्या वतीने हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता पळसदेव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब काळे, कर्मयोगी साखर कारखान्याचे संचालक भूषण काळे, माजी संचालक शरद काळे, पळसनाथ विद्यालयाचे माजी प्राचार्य कालिदास गोडगे सर, कुमार नाईकवडी सर, सामाजिक कार्यकर्ते अंबादास भिसे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य मेघराज कुचेकर, ज्येष्ठ नेते मधुकर रंधवे, पळसदेवचे पोलीस पाटील अनिल कुचेकर, भूविकास बँकेचे माजी व्यवस्थापकसो एकनाथ शेलार , ज्येष्ठ नेते दादासाहेब शिंदे, खंडू दादा काळे, इंदापूर तालुका शिक्षक सोसायटीचे माजी संचालक हरीश काळेल, पत्रकार महिंद्र काळे, पत्रकार प्रवीण नगरे, युवा नेते किरण काळे, दिलीप अडवाल तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी हिराबेन मोदी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.  

close