इंदापूर येथे मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा.
इंदापूर तालुका मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अविनाश बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपणारी व वाढदिवस साजरा करताना सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा या उद्देशाने मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य इंदापूर तालुका व शहर यांच्या वतीने
मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अविनाश बागवे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.१५ डिसेंबर रोजी इंदापूर येथील मूकबधिर शाळेतील मुलांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र शिंदे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बागाव, इंदापूर तालुका अध्यक्ष शरद गायकवाड, युवक तालुका अध्यक्ष सोन्या ढावरे, शहराध्यक्ष अनिकेत सानप इत्यादी उपस्थित होते.

