shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिंगार येथे प्लास्टीक खाल्ल्याने गाईचा मृत्यु ; प्लास्टीकचा वापर टाळा - नाना मोरे


प्रतिनिधी : संजय वायकर 

नगर : १६ / अहमदनगर येथील भिंगार या भागात वडारवाडी येथे एक गौमाता प्लास्टीक खाल्ल्याने मृत्युमुखी पडली . यावेळी प्राणीप्रेमी सामाजिक कार्यकर्ते सतीश ( नाना ) मोरे आणि जमा झालेल्या सर्व हिंदू बांधवांनी गोमातेस उचलून विधिवत गोमातेचा अंतिम विधी केला . तसेच उपस्थित सर्व बांधवांनी श्रद्धांजली वाहिली .

यावेळी नाना मोरे यांनी सांगितले की , प्लास्टीक खाल्ल्याने सदर गोमातेचा मृत्यु ओढवला आहे . गाईस त्रास होत असताना डॉक्टरांनाही बोलविण्यात आले परंतु अथक प्रयत्न करूनही ते गोमातेस वाचवु शकले नाहीत . 

यावेळी नाना मोरे यांनी नागरिकांना आवाहन केले की ,घरातील अन्न व इतर टाकावु पदार्थ कृपया प्लास्टीक मधे भरून कचऱ्यात टाकु नका , जेणेकरून प्राणी ते अन्न प्लास्टीक सहित खाणार नाहीत .

 यावेळी सुजित तागडकर, दिनेश तागडकर,प्रसाद गुंड,ओमकार डाके, दीपक धोत्रे,कृष्णा खिळे,अंकुश तरवडे,पवान अळकुटे,स्वप्नील तागडकर आदी नागरिक उपस्थित होते .
close