shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञानोबा ञिंबक घुले (तात्या) यांचे दुख्खद निधन..!!

             
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:-                                                                           
केज तालुक्यातील व शहरातील सर्व परिचित व्यक्तीमत्व ज्ञानोबा ञिंबक घुले (तात्या) यांचे काल शुक्रवारी रात्री 10:30 वाजता लातूर येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दुख्खद निधन झाले. त्यांना बि. पी. व किडनीचे आजार जडले होते. त्यातून घुले तात्या सावरू शकले नाहीत व डॉक्टर व कुटुंबातील सर्वांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. कालरात्री काळाने झडप मारली व घुले तात्या यांची प्राणज्योत मालवली.     

घुले तात्या यांच्या मागे पत्नी घुले मावशी मुले शिवाजी घुले (लाइन मेन) संभाजी घुले सर, सुना, नातवंडे तसेच मुलगी सौ. आशाबाई सोपानराव घुगे असा मोठा परिवार आहे.                       

घुले तात्या हे शहरी व ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर डि. पी. वाले तात्या म्हणून ओळखले जात असत. त्यांनी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मोठ्या प्रमाणात व कमीत कमी पैसे खर्च करून बसवून देऊन शेतकरी व ग्रामीण भागातील अनेकांची सोय केली होती. त्यांनी या क्षेत्रात अनेकांना मार्ग दर्शन करून उतरवून घडवले. अतुल इंगळे व इस्माईल (गब्बर ) यांचे इलेक्ट्रिकल  क्षेत्रात ते गुरू होते.   

वयाच्या अवघ्या 65 व्या वर्षी घुले तात्या यांच्या जाण्याने केज तालुक्यातील ग्रामीण भागात तसेच शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
close