shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कीर्तनकार ह.भ.प सागर महाराज दिडे यांचे श्रीकृष्ण नगर रहिवाशी यांच्यावतीने कीर्तनाचे आयोजन



शिर्डी प्रतिनिध (संजय महाजन):- धार्मिक बातमी

शिर्डी गजर भक्तीचा साई हरिनामाचा शिर्डी माझी पंढरपूर साईबाबा रमावर या वचनाप्रमाणे आपली शिर्डी पंढरपूरच आहे मग पंढरपूर प्रमाणे दर एकादशीला कीर्तन सोहळा शिर्डी येथे व्हायला पाहिजे अशी साईंची व साई भक्तांची इच्छा आहे असा दृष्टांत देखील काही भक्तांना झाला तो अनुभव भक्तांनी परम साईभक्त श्री साई निर्माण उद्योग समूहाची अध्यक्ष विजुभाऊ कोते यांना सांगितला व हा बाबांचा आदेश समजून विजू भाऊंनी ठरवले की दर महिन्याच्या मोठ्या एकादशी निमित्त साई हरी किर्तन सोहळा शिर्डीमध्ये सुरू करण्यात आला आहे. असे विजू भाऊंनी सांगितले.

सोमवार दिनांक 02/01/2022 रोजी सायंकाळी 7 ते 9 वा किर्तन सोहळा होणार आहे कीर्तनाचे ठिकाण विजुभाऊ कोते वस्तीवर शेवंताबाई मंदिराजवळ एअरपोर्ट रोड श्रीकृष्ण नगर शिर्डी येथे होणार असून भाविकांनी या सोहळ्यातील किर्तन श्रावणाचा व साई खिचडी चा लाभ घ्यावा ही विनंती चौदावी 14 वि कीर्तनाची सेवा श्रीकृष्ण नगर सर्व रहिवाशी यांच्या वतीने होणार आहे तरी भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा असे विजुभाऊ कोते श्री साई निर्माण उद्योग समूह शिर्डी यांनी केले आहे.
close