कोल्हापूर/प्रतिनिधी.
गेल्या आनेक वर्षा पासुन कोतवालांच्या विविध मागण्या संदर्भातील प्रशनांची उकलच झालेली नाही.प्रलंबीत प्रशन त्वरीत निघावे यासाठी नागपूर मधील हिवाळी आदिवेशानसाठी कोल्हापूर मधून कोतवाल बंधु व भगीनी नागपूरकडे रवाना झाले आहेत.जिल्ह्यातील पन्हाळा,शाहूवाडी,गगनबावडा,कागल,करवीर,राधानगरी,आजरा,चंदगड,गडहिंगलज,शिरोळ,हातकणंगले,भुदरगड ह्या तालुक्यातील कोतवाल बंधु व भगीनी सहभागी झाली आहेत.
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना राज्य अध्यक्ष मा. शिवप्रसाद देवणे मा कृष्णा शिंदे राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली हेअदोलन नागपूर येथे होत आहे. या अदोलन साठी दयानंद कांबळे जिल्हाध्यक्ष कोल्हापूर ,संतोष गवळी,स्वागत गुरुव,संजय बुर्ले,संजय तळकर,महादेव कोळी,संजय सुतार,पांडुरंग बरकाळे,रामान्ना कांबळे यांच्या नेतृत्व खाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कोतवाल बाधव अदोलन साठी नागपूर ला रवाना झाले आहेत.ह्या धडक मोर्चा द्वारे आंमच्या कोतवाल संघटनेच्या प्रलंबीत प्रश्न मार्गी लागतील असे जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे यांनी दैनिक शिर्डी ऐकस्प्रेस माध्माशी बोलताना आपले मत व्यक्त केले.
फोटो ओळ:-पन्हाळा तालुका कोतवाल बंधु भगीणी नागपूरला रवाना होताना फोटो.

