शौकतभाई शेख श्रीरामपुर
अहमदनगर येथील दोस्ती फाउंडेशनतर्फे दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार श्रीरामपुर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय नगरकर यांना जाहीर करण्यात आला असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष रज्जाक भाई शेख यांनी सांगितले.
हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दिनांक ०४/१२/२०२२ रोजी येथील संगमनेररोडवरील व्ही.आय. पी. रेस्ट हाऊस याठिकाणी सकाळी अकरा वाजता खालील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. डॉ.एस.एन.पठाण (कुलगुरू नागपूर), बाबासाहेब सौदागर (चित्रपट गीतकार), वसुंधरा शर्मा (सिने अभिनेत्री, जेष्ठ नाट्यकर्मी), रमजानखान पठाण उप शिक्षणाधिकारी), अनिल पवार (प्रांताधिकारी, श्रीरामपूर), प्रशांत पाटील (तहसीलदार श्रीरामपूर),संदिप मिटके (पोलिस उप अधीक्षक, श्रीरामपूर), वंदनाताई मुरकुटे (सभापती पं.स.श्रीरामपूर ), साईलता सामलोटी (गट शिक्षणाधिकारी) , डॉ.गुंफा कोकाटे,सुभाष सोनावणे,सुनील गोसावी,रामदास वाघमारे,राकेशकुमार शिवदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यापुर्वी श्री. नगरकर यांना लातूर येथील वीरशैव लिंगायत समाज बसव महामेळावा तर्फे समाज भूषण पुरस्कार,२०१६, श्री थियेटर्स व श्रीरामपुर रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे श्री थियेटर्स कला गौरव पुरस्कार २०१६, इचलकरंजी येथील वसुंधरा शक्ती सामाजिक सेवाभावी संस्थेचा समाज भूषण पुरस्कार २०२० साली मिळालेला आहे,त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल
त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

