*बैठकीत पुढील लढ्याचे करण्यात आले नियोजन
*घरे वाचवण्यासाठी प्रशासनास देण्यात येणार निवेदन
*प्रशासनाकडून दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा
*बैठकीत आदिवासींनी केल्या आपल्या तीव्र भावना व्यक्त
*बैठकीला महिला, तरुण, वृद्ध, व इतर सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती.
भोसरी । प्रतिनिधी :-
रविवार दिनांक दिनांक ११ डिसेंबर२०२२ रोजी सायंकाळी ६:३० ते ८:३० या वेळेत च-होली खुर्द येथील मरकळ रोडवरील कैलास वाहन ठाकर वस्ती, आणि वडगाव रोडवरील थोरवे वस्ती नजीकची ठाकर वस्ती या आदिवासी ठाकर वस्तीवर बैठक संपन्न झाली.
च- होली खुर्द मधील आदिवासी वस्ती मधील मधील१२३ पेक्षा अधिक कुटुंबे अतिक्रमित म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यासंदर्भात नोटीस प्राप्त झाल्यामुळे आदिवासी ठाकर समाजाच्या लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून गेली ३५ते ४0 वर्ष कुटुंबे या ठिकाणी वास्तव्यास असून नियमित घरपट्टी भरत आहे त्यांच्या घरांच्या नोंदीही झालेल्या आहेत. असे असताना नोटीसा मुळे ते भयभीत झाले आहेत. आम्ही गरिबांनी काय करायचे? कोठे राहायचे ?हा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आपली घरे वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन बैठकीचे आयोजन केले. व पुढील दिशा ठरवली. शासनाकडे हरकती नोंदवून/ निवेदन देऊन जर प्रश्न मिटला नाही तर तीव्र स्वरूपाचे रस्त्यावरचे आंदोलन करण्याची तयारी सर्वांनी दर्शवली .
बैठकी मध्ये शिवशंभू छा्वा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, आणिआम आदमी शेतकरी संघटनेचे खेड तालुकाध्यक्ष, मा. भरत पवळे, खेड तालुका आम आदमी युवा आघाडी तालुका अध्यक्ष, मा. मयूर दौंडकर, पुणे जिल्हा अध्यक्ष शिवशंभू छावा प्रतिष्ठान मा. दत्ताभाऊ टाकळकर प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे , मा.पंढरीनाथ जरे,मा.संपतराव थोरवे, मा.चंद्रकांत काळे, मा.काळूराम थोरवे, मा.विजय काळे,यांनी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले व आधार दिला.
गायरान निवासी आदिवासी कुटुंबांना न्याय मिळाल्याशिवाय लढा थांबायचां नाही असे यावेळी आश्वासन मार्गदर्शन करताना देण्यात आले.

