shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगरच्या खेळाडूची राष्ट्रीय रग्बी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : २० /  नेरळ जिल्हा रायगड या ठिकाणी १४ वर्षे आतील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय रग्बी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .त्यामध्ये अहमदनगर जिल्हा संघाने चांगली कामगिरी केली . त्यातून अहमदनगर संघाचा  उत्तम कांजरा या खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेच्या सराव शिबीरा साठी  निवड झाली होती . 

सदर शिबिरामध्ये महाराष्ट्रातून २४ खेळाडू शिबिरा करिता निवडले होते . त्या मधून १२ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड झाली यात  अहमदनगर जिल्ह्याचा खेळाडू उत्तम कांजरा याचा समावेश आहे . तो आत्मामालिक  क्रीडासंकुल कोपरगाव चा विद्यार्थी आहे . २१ व २२ डिसेंबरला अहमदाबाद या ठिकाणी राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे . 

 उत्तमला पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या .  आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल ट्रस्ट चे अध्यक्ष मा . नंदकुमार सूर्यवंशी सर रग्बी असोसिएशन ऑफ अहमदनगर चे अध्यक्ष श्री श्रीनिवास बच्चा, सचिव विवेक सूर्यवंशी, शेख युसुफ, प्रदीप पाटोळे, अहमदनगर जिल्हा प्रशिक्षक सुनील चौधरी व सर्व क्रीडा शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या.
close