shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निवडणूक संपली,गावाच्या विकासाची कामे सुरू करू -प्रा.ईश्वर मुंडे..!

जयसिंग सोळंके यांच्या वाढ दिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप!

प्रकाश मुंडे |  बीड जिल्हा प्रतिनिधी  :-
किल्ले धारूर तालुक्यांतील गांजपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रवादी युवक कॅांग्रेस पार्टी चे बीड जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांच्या वाढ दिवसान्नित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या वेळी गांजपूर चे सुपुत्र प्रा.ईश्वर मुंडे,प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल हे बोलत होते.
     
निवडणूक ही लोकशाहीतील एक प्रक्रिया आहे. गावातील मतदारांनी जनमताचा कौल दिलेला आहे.सरपंच व सदस्य यांना निवडून देवून एक जिम्मेदारी दिलेली आहे.या जिम्मेदारीचा स्वीकार करून गावच्या विकासाचे कामे सुरू करू असे मत प्रा.ईश्वर मुंडे यांनी मांडले.
     

पुढे बोलताना प्रा.ईश्वर मुंडे म्हणाले की,गावाच्या विकासाचा रस्ता शाळेच्या आंगणातीन जातो म्हणजेच खरा विकासाचा पाया प्राथमिक शाळेतून घातला जातो.म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेचा शैक्षणिक व भौतिक विकास झाला पाहीजे.विद्यार्र्थांचा सर्वांगीण विकास झाला पाहीजे.हा विकास करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहेत.
     
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचीत सरपंच कस्तूराबाई साला पवार या होत्या.
       
कार्यक्रमास नवनिर्वाचीत ग्राम पंचायत सदस्य सौ.सुभद्राबाई आनंदराव मुंडे,सौ.शालूबाई बापूराव पारवे,सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन भिमराव डापकर,माजी सरपंच इंदरराव मुंडे,सुंदराबाई पवार,सुर्यकांत डापकर,विजयकुमार मुंडे,भिमा पवार,अच्यूत डापकर,संजय सिरसट,आबासाहेब डापकर,गहिनीनाथ सिरसट,विष्णू घुगे,महादेव डापकर,दिनकर डापकर,सहदेव डापकर,हनुमंत मुंडे,धनराज डापकर,सोमनाथ डापकर,श्रीकृष्ण डापकर,शंकर सिरसट,गोरख गिरी,गणेश डापकर,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक व अंगणवाडी चे कर्मचारी यांची उपस्थीती होती.
    
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन अंगद डापकर यांनी केले.
close