shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी दिला दिव्यांग बांधवांना आधार.

जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी दिला दिव्यांग बांधवांना आधार.

प्रवीण माने यांच्या वतीने दिव्यांग बांधवांना चष्मे वाटप व बारा व्यक्तींच्या डोळ्याचे केले मोतीबिंदूचे ऑपरेशन

इंदापूर प्रतिनिधी: जागतिक दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या डोळे तपासणी शिबिरात ज्या अपंग बांधव यांची तपासणी करण्यात आली होती व त्यांना चष्मे देण्यात येणार होते  त्या संदर्भात दि.३० डिसेंबर २०२२ रोजी इंदापूर पंचायत समिती अल्पबचत सभागृह येथे जिल्हा परिषदचे सदस्य बांधकाम व आरोग्य माजी सभापती  प्रविण  माने यांच्या हस्ते ६५ दिव्यांग बांधव  व्यक्तिनां  चष्मे वाटप करण्यात आले.
 तसेच १२ जणांचे ऑपरेशनचा खर्च प्रविण  माने यांनी केला असल्याची माहिती प्रहार अपंग संघटनेचे बाबासाहेब पाटोळे यांनी माहिती दिली.यावेळी दिव्यांग बांधवांना सहकार्य करून आधार दिल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या पदाधिकारी यांच्या वतीने  प्रवीण माने यांचे विशेष आभार मानण्यात आले.

 यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष  बाबासाहेब पाडुळे, तालुका अध्यक्ष अंनतराव गायकवाड , सचिव  रामदास चव्हाण, शहराध्यक्ष सचिन सुर्यवंशी  पाटोळे,  तालुका महिला अध्यक्ष कु.दिपालीताई वाघमोडे, उपाध्यक्ष सुक्षला ढाणे ,कार्याध्यक्ष शोभाताई परदेशी , शिंगाडे, भारत शेंडे ,दादा शिंदे, रुई अध्यक्ष लावंड रामचंद्र घोळवे आदि मान्यवर उपस्थित होते .
close